दुर्धर आजाराने गौरी सिनकरचा मृत्यू

Khozmaster
1 Min Read

मेहकर 🙁  तालुका प्रतिनिधी )

एका ११ वर्षीय मुलीचा दुर्धर आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच मासरुळ घडली. येथे भारतीय सैन्यदलातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले बळीराम सिनकर यांची ११ वर्षीय मुलगी गौरी हीला गेल्या काही महिन्यांपासून अज्ञात आजाराने ग्रासले होते. आजाराचे निदान करण्यासाठी सिनकर यांनी मोठमोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयांचे उंबरठे झिजवले. मात्र, गौरीच्या अज्ञात आजाराचे निदान कोणत्याच डॉक्टरांकडन झाले नाही.दरम्यान, दिवसेंदिस गौरीला होणार त्रास वाढतच जाऊन उपचारादरम्यान तीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. या चिमुकलीच्या दुःखद निधनाने सिनकर कुटुंबियांसह मासरूळ गावावर शोककळा पसरली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची मुलगी व पुतण्याचे देखील दुःखद निधन झाले होते, हे विशेष !

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *