मेहकर:-तालुका प्रतिनिधी
नगर परिषदेच्या हद्दीत एकूण १४,८९० मालमत्ताधारक असून, त्यांच्याकडून मालमत्ता कराची ३ कोटी १७ लाख २८ हजार ३१५ रुपये २०२५ मार्चअखेर थकबाकी आहे तसेच पाणीपट्टी वसुली केवळ ३५ टक्केच झाली आहे. यामुळे थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. नळकनेक्शन बंद करण्याची कारवाई केली जात आहे. मार्च अखेरीस शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नगर परिषद प्रशासन अॅक्शन मोडवर आहे. नगर परिषदेतील कर भरणा केंद्र शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी देखील सुरू आहे. विलास दाभाडे, विजय कटारे, गजेंद्र ढंडोरे, शे. शमीम, अजीस, अ. तस्लीम, अ. कय्युम, राजेश मैंद, प्रकाश सौभागे, विष्णू मानवतकर, प्रमोद पाटील, शे. खाजा, शे. इब्राहिम, अमोल साळवे, संजय खोडके, रामेश्वर बचाटे, जावेद गवळी, गिरीधर सुरुशे, संदीप टाक, सनी मानवतकर आदींनी थकीत कर वसुली सुरू केली आहे.
Users Today : 20