भूमिपुत्र च्या नियुक्त्या जाहीर…

Khozmaster
1 Min Read

वाशिम:- भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या मालेगांव तालुका अध्यक्ष पदी केळी येथिल माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद दिनकरराव घुगे यांची नियुक्ती करण्यात आली. तर वाशिम तालुका युवक अध्यक्ष पदि आडोळी येथिल युवा कार्यकर्ते महादेव सोपान इढोळे यांची नियुक्ती करण्यात आली. भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वाशिम येथिल मध्यवर्ती कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, राज्य संघटक डाॅ.जितेंद्र गवळी, वाशिम जिल्हाध्यक्ष रामेश्वरभाऊ अवचार, युवक जिल्हाध्यक्ष सचिन काकडे, वाशिम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, तोंडगाव सर्कल प्रमुख गजानन काकडे सह जिल्ह्य़ातील भूमिपुत्र चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. या वेळी जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार यांनी संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांचा चार आॅक्टोबरला होणार्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण दिवसभर भूमिपुत्र च्या शाखा स्थापनेचे नियोजन करण्यात आले आसुन रिसोड येथे दिनांक चार आॅक्टोबरला तर मालेगांव येथे पाच आॅक्टोबरला मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर संयोजक महाविर पवार हे शिबिराचे नियोजन करीत आसुन वाशिम जिल्ह्य़ातील सर्व तालुकाध्यक्ष व युवक पदाधिकारी संपुर्ण जिल्ह्य़ात पन्नास शाखा स्थापनेचे नियोजन करण्यात आल्याची माहीती जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, युवक जिल्हाध्यक्ष सचिन काकडे, वाशिम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे यांनी दिली.

0 9 3 7 2 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *