कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध कारवाई करा शिवसेना पदाधिकारी आक्रमक

Khozmaster
1 Min Read

मेहकर:-तालुका प्रतिनिधी 

कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणारे गाणे म्हटल्याने कामरा याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून मेहकर पोलिसांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधी वैयक्तिक व शिवराळ भाषेत टीका करणारे गाणे कॉमेडियन कुणाल कामरा याने जाहीर कार्यक्रमात सादर केले. हा प्रकार अतिशय निंदनीय असून या घृणास्पद प्रकाराची मेहकर तालुका शिवसेनेने कठोर शब्दात निंदा केली असून सदर कलावंतावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर व्यक्तीवर कारवाई न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, तालुकाप्रमुख भूषण घोडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, उपतालुका प्रमुख रोहिदास जाधव, ज्येष्ठ नेते परसराम मानघाले, नितीन राऊत, रामेश्वर भिसे, आकाश ढोरे, विकास जोशी, साबीर गवळी, अशोक पसरटे, रमेश गायकवाड, मंगेश गायकवाड, पियुष केळे, संजय ठोकळ, संतोष अवस्थी, श्याम डोंगरे, भैय्याज ठेकेदार, शेख अमीन, निलेश काळे, विशाल जाधव, चेतन गायकवाड, सुमित शिंदे, विलास आखाडे, पिंटू भुजवटराव यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *