बगदालभ्य ऋषी यात्रेनिमित्त महाप्रसाद वितरण

Khozmaster
2 Min Read

मेहकर:-तालुका प्रतिनिधी 

मेहकर तालुक्यातील उटी येथील प्रसिद्ध सप्तऋषी बगदालभ्य ऋषी संस्थान येथे यात्रेनिमित्त २८ मार्च २०२५ रोजी महाप्रसाद वितरण माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.परिसरातील सात ऋषींपैकी एक ऋषी बगदालभ्य यांचा पुरातन आश्रम उटी जवळील निसर्गरम्य डोंगर परिसरात आहे. येथे दरवर्षी ती यात्रा भरते. यावर्षीही यात्रेनिमित्त भजन, कीर्तनातून प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज प्रदोष शिवरात्री निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविक यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, दुपारी माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते महाप्रसाद वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थांचे अध्यक्ष पांडुरंग नामदेव चांदणे, सचिव सुभाषराव आंधळे, विश्वस्त माणिकराव धोटे, मधुकर सुळकर, सुरेश धोटे, शेषराव श्रीराम धोटे, शिवाजी आंधळे, राजेंद्र पंढरी धोटे, नारायण होणे, शिव पाटील तेजनकर, मोहन धोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थांपासून उटी पोच मार्गाचे बांधकाम सध्या सुरू असून हे काम दर्जेदार करण्याची सूचना संजय रायमुलकर यांनी केली. बदालत्य ऋषी संस्थानला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा प्राप्त असून संजय रायमुलकर यांच्या प्रयत्न येथे विविध विकास कामे झाले आहेत. त्याचबरोबर विशेष बाब म्हणून येथील संस्थान परिसरात भक्तनिवास, विशेष रस्ता, विद्युतीकरण, सौंदर्याकरण यासाठी तीन कोटी ६२ लाख रुपये यापूर्वीच रायमुलकर यांनी मंजूर करून आणले आहेत. यातील कामांची निविदा प्रक्रिया पार पडून ही कामे लवकरच सुरू होतील, असे रायमुलकर यांनी सांगितले.

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *