मेहकर:-तालुका प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज छत्रपती अर्बनचा शुभारंभसंपन्न होत आहे. आ. सिद्धार्थ खरात, माजी आमदार संजय रायमूलकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, उबाठाचे संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, ऋषी जाधव, सुरेशतात्या वाळूकर, कासम गवळी, अधिकारी वर्ग आदी उपस्थित राहणार आहेत. अंत्री देशमुख रोड, रामनगर मेहकर येथे सकाळी ११ वाजता संपन्न होत असलेल्या ह्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष दिलीपसेठ वाघ, विजेंद्रकुमार धोंडगे, डॉ अंकित धोंडगे यांचेसह संचालक सर्वश्री अरविंद धोंडगे, वैभव वाघ, तोताराम गारोळे, भगवान वायाळ, भानुदास देव्हडे, राजेश बळी, पुंडलिक मोरे, आर. डी. काटे, सुनील गट्टानी, शरद ठाकरे, डॉ महेश येवले, संतोष नाईकवाडे, शंकर चनखोरे, डॉ स्वप्नील गारोळे, सौ शीतल धोंडगे, सौ संजीवनी पिसे यांचेसह स्थानिक संचालकांनी केले आहे.शिवानी वायाळ यांचा सत्कार छत्रपती अर्बनच्या शुभारंभ प्रसंगी शिवानी धनंजय वायाळ यांचा बेसिक बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमात चांगल्या रॅक बद्दल राज्यपालांच्या हस्ते गौरविल्याबद्दल त्यांचा केंद्रीय मंत्री ना प्रतापराव जाधव यांचेसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. (वि.प्र.)
Users Today : 20