आंधृड येथे जिजाऊ ब्रिगेड शाखेची स्थापना

Khozmaster
2 Min Read

मेहकर:-तालुका प्रतिनिधी 

वीर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतीपित्यर्थ शहीद दिनानिमित्त मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड बुलढाणा दक्षिण यांच्या वतीने ‘गाव तिथे शाखा’ या अभियानांतर्गत आंध्रुड या गावात शाखेची स्थापना करण्यात आली. हा कार्यक्रम २३ मार्च रोजी, दुपारी ४ वाजता उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि सामूहिक जिजाऊ वंदना म्हणत संपूर्ण वातावरण शिवमय झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षपद जिजाऊ ब्रिगेड बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अॅड. उर्मिला हाडे यांनी भूषवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता देशमुख (मेहकर तालुका कोषाध्यक्ष) यांनी केले. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक माणिकराव देशमुख यांनी शाखा स्थापनेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा जनार्दन हरिभाऊ लोढे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) यांच्या हस्ते शाल व मराठा सेवा संघाच्या शिवधर्मदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला.नवनियुक्त ग्रामशाखा कार्यकारिणीच्या अध्यक्षः शिवमती नीता देशमुख, उपाध्यक्षः शिवमती मीना देशमुख, सचिवः शिवमती अर्चना देशमुख, कोषाध्यक्षः शिवमती ऋतुजा शुभम देशमुख, संघटकः शिवमती विद्या देशमुख, सहसंघटकः शिवमती हर्षा देशमुख, सहसचिवः शिवमती कविता देशमुख, प्रसिद्धी प्रमुखः शिवमती नंदा देशमुख, कार्याध्यक्षः शिवमती वनिता देशमुख, सदस्यः शिवमती स्वाती देशमुख, शिवमती त्रिवेणी देशमुख, शिवमती सुहानी देशमुख, शिवमती आश्विनी देशमुख, शिवमती मंगला देशमुख, शिवमती पूजा कव्हाळे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हा अध्यक्ष अॅड. उर्मिला हाडे, सुनीता देशमुख, सुनीता सोळंके, व दुर्गा चव्हाण (तालुका संघटक) यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.मराठा जोडो अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करत जिल्हा अध्यक्ष अॅड. उर्मिला हाडे यांनी महिलांनी शिवविचार घराघरात पोहोचवावेत आणि मराठा जोडो अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दुर्गा चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला महिलावर्ग व युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, बुलढाणा जिल्ह्यातून ‘गाव तिथे शाखा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (वि.प्र.)

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *