मेहकर पं.स.वार्षिक आमसभा सरपंच मेळावा शांततेत सात वर्षानंतर झालेल्या सभेत अनेक प्रश्नांना योग्य न्याय

Khozmaster
2 Min Read

मेहकर:-तालुका प्रतिनिधी 

ग्रामीण भागाच्या विकासाची प्रश्न आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी तब्बल सहा वर्षांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पंचायत समितीच्या आमसभेला सुरुवात करण्यात आली.ना. मंत्री. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आमसभेला मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, माजी, आमदार संजय रायमुलकर, माधवराव जाधव, सुरेश तात्या वाळूकर, आशिष राहटे, बळीराम मापारी, अरुण दळवी, संतोष धनतोंडे, निवाजी पांडव, दत्ता पाटील, किशोर गारोळे, गिरधर पाटील अनंतराव वानखेडे, सेवादल काँग्रेसचे शैलेश बावस्कर, अॅड आकाश घोडे, अ.मोरे, भास्करराव ठाकरे, सारंग माळेकर, डॉ. सार्थ खरात, अँड संदिप गवई, जिजाताई चांदेकर स्वातीताई नवले, संदीप गवई, गजानन सावंत, साहेबराव मोरे, बांचा सह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर उमेश देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी धीरज जाधव, तहसीलदार मडके साहेब, बिस्तार अधिकारी शिवाजी गवई, पंडागळे साहेब, बिस्तार अधिकारी संदीप मेटांगळे, सांख्यिकी विस्तार अधिकारी जे.डी. जाधव, एस के पवार, जी. तपासे, कृषी अधिकारी परिहार, अभियंता डी.बी. राठोड, अभियंता बिजय राठोड, प्रवीण गायकवाड, गीमती जे. डी पवार, श्रीमती जी. के काळदाते, कनिष्ठ सहाय्यक श्री डोके, बरिष्ठ सहाय्यक गी काटे, श्रीमती अहिरे, श्रीमती वानखेडे, श्रीमती राजपूत, श्रीमती शेळके, आदी उपस्थित होते. तर तालुक्यामधील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत एकून सात शाळेला पुरस्कार प्राप्त झाले असल्याने प्रथम क्रमांक, जिजामाता हायस्कूल हिवरा खुर्द. ११ लाख रुपये, जि. प. शाळा पिंपरी माळी ५ लाख रुपये, अंजनी बु. ३ लाख रुपये, जि. प. शाळा घाटबोरी २ पैनटाकळी १ लाख त्या अनुषंगाने सर्व मुख्याध्यापक यांचे सत्कार करण्यात आले. तालुक्यातून स्मार्ट ग्रामपंचायत मध्ये मुदेफळ, लोणी गवळी असल्याने त्या गावातील सरपंच, सचिव यांचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेच्या सुरुवातीला गटविकास अधिकारी यांनी मान्यवराचे सत्कार करून बार्षिक आढावा सादर केला. अनेक प्रश्नांच्या प्रश्न उत्तरात जल जीवन मिशन च पाणी टंचाई सभेचे आकर्षण बनले, अनेक गावात जनजीवन मिशन अपूर्ण असून मोठ्या प्रमाणात गावामध्ये पाण्याचा प्रश्न उपस्थित झालेला दिसला.बांधकाम/घरकुल विभाग,आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, मनरेगा स्वच्छ भारत अभियान, डॉक्टर बाचासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुडा कृषी क्रांती योजना, राष्ट्रीय बायोगॅस व खत विकास कार्यक्रम, पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय ग्रामीण जीवनीत्रती अभियान, यांच्या प्रमुखांनी बोजनेची चार्षिक अहवाल सादर केले.

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *