मेहकर:-तालुका प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून मेहकर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम युद्ध पातळीवर सुरू असल्यामुळे शहरातील जवळपास चारशे ते पाचशे दुकानदारांचा रोजगार गेला आहे. त्या दुकानदारांनी हतबल न होता बुलढाण्याच्या धर्तीवर ‘ना नफा ना तोटा’ असे कॉम्प्लेक्स शासकीय जागेवर अर्बन बँकेच्या माध्यमातून बांधून देण्यात येतील. त्यामुळे कोणत्याही दुकानदाराने खचून जाऊ नये, असे आवाहन केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे.शहरातील जानेफळ रोड, सोनाटी रोड, डोणगाव रोड या भागातील अतिक्रमण हटविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक दुकानदार बेरोजगार झाले आहेत. अशाच पद्धतीने गेल्या काही वर्षांपूर्वी बुलढाणा शहरातील अतिक्रमण काढण्यात आले होते. त्या ठिकाणचे दुकानदारदेखील बेरोजगार झाले होते. परंतु त्यांना महाराष्ट्र अर्बन बँक व बुलढाणा अर्बन बँक यांनी शासकीय जमिनीवर ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर गाळ्यांचे बांधकाम करून दिले आहे.त्यामुळे बुलढाणा शहरातील अतिक्रमणधारक दुकानदारांचा रोजगारांचा प्रश्न मिटला आहे. याच धरतीवर मेहकर शहरातील अतिक्रमणधारकांना देखील महाराष्ट्र अर्बन बँक अशाच प्रकारच्या शासकीय जमिनीवर ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर गाळ्यांचे बांधकाम करून देईल आणि ते गाळे त्या दुकानदारांना देण्यात येतील. त्यामुळे कोणत्याही दुकानदाराने आपला रोजगार गेला म्हणून हातबल होऊ नये, असा धीर केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी दिला आहे.
Users Today : 26