मूळाशी जावून आजाराचे निदान करा

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

चार महिन्यांपूर्वी शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये केसगळती झाली. आता नखगळतीचे प्रकार वाढत असल्याने केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केंद्र सरकारच्या पथकाला या आजाराच्या मुळाशी जाऊन कार्य करण्याचे निर्देश दिले.मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. यावेळी आयसीएमआर, राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता विभाग, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्लीचे डरमेटोलॉजी तज्ज्ञ, भारतीय गहू व जव संशोधन केंद्र हरियाणा, प्लांट क्वारंटाइन विभाग आणि कृषी मंत्रालयाचे तज्ज्ञ तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते उपस्थित होते. ना. प्रतापराव जाधव म्हणाले, रुग्णांना पुन्हा त्रास होऊ नये यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरू करा. आजाराचे मूळ कारण शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करा. यासाठी रुग्णांचे रक्ताचे नमुने तसेच बाधित गावातील पाणी, माती, धान्य आदींचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल सादर करण्याचे सूचनाही त्यांनी दिल्या.दोन दिवस बाधित गावांना भेटी केंद्रीय पथक दोन दिवस बांधीत गावाला भेटी देणार असून रुग्णांशी भेटी घेऊन आजाराचे मूळ कारण शोधणार आहे. त्यामुळे नागरिकांनी केंद्रीय पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन ना. प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले.

0 9 5 4 9 6
Users Today : 222
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *