काँक्रिट मिक्सर मशीनचा महत्त्वाचा पार्ट काढून नेला ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल

KHOZ MASTER
1 Min Read

नांदुरा:-तालुका प्रतिनिधी 

अॅजाक्स अॅक्युरा काँक्रीट मिक्सर मशीनचा महत्त्वाचा पार्ट ऑपरेटरने विनापरवानगी काढून नेल्यामुळे मिक्सर मशीन मालकाने ऑपरेटरवर गुन्हा दाखल केल्याची घटना १५ ते १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली.याबाबत फिर्यादी तेजराव गुलाबराव अंभोरे रा. एकलारा ता. चिखली यांचा ठेकेदारी व्यवसाय आहे. त्यांच्याकडे असलेले अॅजाक्स अॅक्युरा काँक्रीट मिक्सर मशीन त्यांनी त्यांचा मित्र कृष्णा पाटील यांना भाड्याने दिले होते. त्यांचे काम आटोपल्यामुळे त्यांनी फिर्यादी तेजराव अंभोरे यांना मिक्सर मशीन घेऊन जाण्यास सांगितले. यावेळी फिर्यादीने ऑपरेटरला मिक्सर मशीन घेऊन येण्यास सांगितले. ऑपरेटर आरोपी समीर राजपूत रा. ललितपुर उत्तर प्रदेश याने मिक्सर मशीन घेऊन न येता त्यातील महत्त्वाचा पार्ट मीटर काढून घेऊन गेला. त्याची किंमत अंदाजे एक लाख २५ हजार रुपये आहे. महत्त्वाचा पार्ट आरोपी घेऊन गेल्यामुळे काँक्रीट मिक्सर मशीन जागेवरच उभे आहे. त्यामुळे फिर्यादीचे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता ३१६ (२) कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बांगर करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *