गावरान आंबा उपलब्ध नसल्याने पाहुणचार होणार खर्चिक

Khozmaster
2 Min Read

मासरुळ:-विशेष प्रतिनिधी 

ग्रामीण भागासह शहरी भागात गावरान आंबा उपलब्ध नसल्यामुळे यावर्षी पाहुणचार खर्चिक होणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या काही ठिकाणी गावराण सोडून इतर प्रकारचे आंबे उपलब्ध होण्यास सुरूवात झाली असून आंब्याचे भाव पाहता खिशाला जास्तीची आर्थिक झळ बसणार असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील आंबा बाजारभाव सध्या सरासरी १०० रुपये ते २०० रूपये प्रति किलोच्या दरम्यान आहे. हा भाव आंब्याचा प्रकार, चव आणि गुणवत्तेनुसार बदलतो. दरवर्षी आंब्याच्या नवनवीन जाती उपलब्ध होत असून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी आंब्याची रोपे खरेदी करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत. तसेच पूर्वीच्या प्रमाणात गावोगावी बघायला मिळणाऱ्या आंब्याच्या आमराया नेस्तनाबूत झालेल्या दिसत आहे. मागील दोन वर्षांपेक्षा यंदा आंब्याच्या दरामध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून बाजारात परराज्याची आवक कमी झाल्याने यंदा आंब्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी पाहुणचार करणे ही खर्चिक बाब झाली असून त्यावरही परिणाम होणार असल्याचे चिन्हे दिसत आहे. मागणी व पुरवठ्याचे गणित बिघडल्याने यंदा खवय्यांचा खिसा चांगल्या प्रकारे रिकामा होणार आहे.
पूर्वी गावरान व कलमी आंबे बाजारपेठेमध्ये जास्त प्रमाणात दिसत होते. परंतु, आता गावराण व कलमी आंबे दुर्मिळ झाले असून सर्वसामान्यांना आंब्याचे चव चाखायला मिळेल की नाही, ही मोठी शंका निर्माण होत आहे. बाजारपेठेमध्ये परराज्यातील आंब्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दिसत असून या आंब्याची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची दिसून येते. केसर, हापूस, दसेरी, लालबाग अशा विविध प्रकारच्या नवनवीन जातींचे बाजारपेठेमध्ये महत्त्व वाढले दिसून येते. आवक कमी असल्यामुळे दरात वाढ आवक कमी झाल्याने यंदा आंब्याच्या दरामध्ये वाढ दिसून येते. राज्यातील तसेच पर राज्यातील तसेच परराज्यातील आंब्याची आवक सुरू झाल्याने बाजारपेठेमध्ये आंब्याचे दर हे वाढलेले असून वाढलेल्या दरामुळे आंबा खरेदीचे प्रमाण कमी झालेले दिसून येत असल्याचे व्यापारी वर्ग सांगत आहे.

0 9 5 4 9 6
Users Today : 222
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *