बेलगावमध्ये रोजगारसेवकाच्या घराला आग

KHOZ MASTER
1 Min Read

डोणगाव:-तालुका प्रतिनिधी 

जवळच असलेल्या ग्राम बेलगाव येथील रोजगार सेवक निवृत्ती इंगळे यांच्या घराला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना २१ एप्रिलच्या रात्री घडली. वेळेवर आरडा ओरड केल्याने गावकरी जागे होऊन आग आटोक्यात आणल्या गेली.मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे रोजगार सेवक निवृत्ती इंगळे (वय ६०) यांच्या राहत्या घराला रात्री आग लागल्याची माहिती शेख सैयदा भाई यांनी आरडाओरडा केला. सुदैवाने उन्हाळा असल्याने सामान्य कुटुंब हे रस्त्यावर झाडाखाली झोपल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. आग विझविण्यासाठी नागरिकांची रात्री धावपळ सुरू करत होती. मात्र, बेलगाव येथील मारुती बोरकर यांनी टँकरमध्ये भरलेले पाणी आणून मदतीचा हात दिला. आणि आग आटोक्यात आणली. या आगित घरातील कागदपत्रे, मोबाइल, धान्य, भांडी, किराणा व काही पैसे जळून खाक झाले. सदर कुटुंब उघड्यावर आल्याने पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांनी आर्थिक मदत केली. दरम्यान, पंचासमक्ष महसूल कर्मचारी अरुण यांनी नुकसानीचा पंचनामा करून संबंधित विभागाला प्रस्ताव सादर करणार आहे. सदर नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाने तत्काळ मदत देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, आ. सिद्धार्थ खरात यांनी फोन करून रोजगार सेवक यांना शासनापर्यंत घराची माहिती देऊन मदत देण्याची आश्वासन दिले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *