सिंदखेड राजा:-तालुका प्रतिनिधी
महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने १२ बदलांचे नोटीस काढलेत. कारण त्यात जात, मनू, मांग, महार, शुद्र, पेशवाई अशा शब्दांचा उल्लेख आहे. सावित्रीमाईंच्या अंगावर शेण फेकण्याचा ऐतिहासिक सत्यप्रसंग दाखवलाय. ‘तुमचे हातपाय वेगळे केले असते’ हा क्रांतिकारी संवाद आहे, असे आयोजकांनी सांगितले. यावरून ‘फुले’ चित्रपट म्हणजे ब्राह्मणांच्या विरोधात नसून तो ब्राह्मणीवादी विचारांच्या विरोधावर आधारित आहे, त्यामुळे ‘फुले’ चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित करावा, अशी मागणी २२ एप्रिल रोजी तहसीलदार अजित दिवटे यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.याबाबत निवेदनात नमूद केले आहे की, हेच सेन्सॉर बोर्ड काश्मीर फाईल्स आणि केरळा स्टोरी सारख्या द्वेषमूलक खोट्या चित्रपटांना जसेच्यातसे मान्य करतो. परंतु, फुले चित्रपटाला कात्री लावतो. हे फक्त चित्रपटाचं सेन्सॉरिंग नाही तर हे फुलेंच्या विचाराचा, बहुजनांच्या इतिहासाचा व आमच्या अस्मितेचा अपमान आहे, असे बामसेफचे तालुकाध्यक्ष डॉ. भिमराव म्हस्के यांनी सांगितले. या देशात अजूनही पेशवाईचे विचार आणि मनूचे पुत्र सेन्सॉर बोर्डात बसलेत, हेच दुर्दैव आहे. या बोर्डाच्या सर्व मनुवादी सदस्यांची तत्काळ हकालपट्टी झालीच पाहिजे, असे उपस्थित महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष यांनी सांगितले. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, देविदास ठाकरे, विष्णू मेहेत्रे, शाम मेहेत्रे, राजेंद्र अंभोरे, सिद्धार्थ जाधव, प्रकाश मेहेत्रे, दिलीप चौधरी, नरहरी तायडे, प्रकाश आढाव, डॉ. भिमराव म्हस्के, वैभव मिनासे, सागर मेहेत्रे, उमेश खरात, अमोल ठाकरे, त्र्यंबंक मगर, प्रल्हाद माने, बाबासाहेब बनसोड, समाधान बबनराव घुगे, अर्जुन काकडे, साहेबराव जावळे, नंदकिशोर खरात, डी. बी. खरात, संजय ठाकरे, सिध्दार्थ म्हस्के, हरिदास सोनुने, वनश्री जनाबापू मेहेत्रे, नामदेव राठोड, अमोल खरात, चंद्रकांत शंकर बनसोड, दत्तात्रय खरात, एकनाथ मेहेत्रे, गणेश मोरे, संतोष पाडमुख, सरकटे, जाधव व बहुसंख्य शहरवासी उपस्थित होते. शेवटी राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश मेहेत्रे यांनी आभार व्यक्त केले.
Users Today : 222