बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
नुकत्याच वर्धा येथे झालेल्या १७ वर्षाखालील मुलींच्या शालेय राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत विद्यालय बुलढाणाच्या संघाने अजिंक्यपद प्राप्त केले.
बुलढाणा शहरातून क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा मुलींचा हा पहिलाच संघ ठरलेला आहे. या स्पर्धेत उपांत्य सामन्यात नाशिक विभागावर तर अंतिम सामन्यात औरंगाबाद विभागावर दणदणीत विजय प्राप्त केला. फलंदाजीमध्ये नेहमीच उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या यष्टिरक्षक कर्णधार प्रणिता उगले हिला फलंदाजीमध्ये ऋतुजा पंडित, वेदिका गवळी, कृष्णाली देशपांडे, भाग्यश्री भामद्रे यांची साथ मिळाली. तर गोलंदाजी मध्ये वेगवान गोलंदाज मृणाल पडोळसे सोबत प्रतीक्षा खरे, प्रगती लोखंडे, वैष्णवी हिंगे, सुजाता हिवाळे, ऋतुजा पंडित यांनी धुरा सांभाळली. सायली साखरे, सानिका लहाने, भाग्यश्री भामद्रे यांनी क्षेत्ररक्षण मध्ये चमकदार कामगिरी केली. दोन सामन्यांमध्ये यष्टींच्या मागे प्रणिता उगले हिने सुंदर यष्टीरक्षण करत तीन झेल व दोन यष्टीचीत केले.स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये राज्यस्तर विजेतेपदाचा चषक कर्णधार प्रणिता उगले व प्रशिक्षक संजय देवल यांनी सर्व संघासमवेत स्वीकारला. संघातील सर्व खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या संघात कर्णधार वष्टीरक्षक प्रणिता उगले, ऋतुजा पंडित, वैष्णवी हिंगे, प्रगती लोखंडे, वेदिका गवळी, कृष्णाली देशपांडे, भाग्यश्री भामद्रे, सायली साखरे, सानिका लहाने, मृणाल पडोळसे, प्रतीक्षा खरे, सुजाता हिवाळे, रिद्धी कोकाटे, सारा बानो प्रशिक्षक संजय देवल, सावरमल शर्मा यांचा समावेश आहे.
Users Today : 223