सुनगाव येथे अंगणवाडीत पोषण पंधरवड्याचे आयोजन एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाचा उपक्रम

Khozmaster
2 Min Read

जळगाव जामोद:-विशेष प्रतिनिधी 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जळगाव जामोद अंतर्गत जामोद बीटचा मुख्यमंत्री शंभर दिवसपूर्ती आराखडा या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी पोषण पखवडाचे आयोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सूनगाव येथे २२ एप्रिल रोजी करण्यात आले होते.कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉ. अपर्णा कुटे, अध्यक्षस्थानी सुनगाव सरपंच रामेश्वर अंबडकार, मार्गदर्शक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रमोद मानकर, जामोद बीट पर्यवेक्षिका रेखा वानखडे, ग्रामपंचायत सदस्य योगिता कुरवाडे, लता तायडे, शाळा समिती अध्यक्ष किशोर धुळे, शाळेचे मुख्याध्यापक राखोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांनी पोषण आहाराचे महत्व माता पालकांना समजावे म्हणून विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. उपस्थित गरोदर माता व महिलांना आहाराविषयी आरोग्य विषयी सखोल असे मार्गदर्शन डॉ. अपर्णा कुटे यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा जामोद सर्कलच्या पर्यवेक्षिका रेखा जयदेव वानखडे यांनी सादर केली. अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रेकर याद्वारे अंगणवाडीतील सर्व कामे ऑनलाईन करावी लागतात त्यामध्ये फोटो प्रमाणे व ई प्लस ई केवायसी झाल्याशिवाय मुलांना आहार वाटप करायचा नाही, अशा शासनाच्या सूचनेनुसार अंगणवाडी सेविकांना आहार वाटपामध्ये पारदर्शकता यावी म्हणून फेसिअल रेक्नायझेशन सिस्टीम द्वारेच लाभार्थ्यांना टीएचआर वाटप करायचा आहे तो अंगणवाडी सेविकांचा उत्साह वाढवा आणि इतर सेविकांना प्रेरणा मिळावी म्हणून एचआरएस चे काम शंभर टक्के झालेल्या सेविकांचा सत्कार डॉ. अपर्णाताई कुटे, बालविकास प्रकल्प अधिकारी मानकर, सरपंच रामेश्वर अंबडकार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केल्याबद्दल जामोद सर्कलच्या पर्यवेक्षिका रेखा जयदेव वानखडे यांचा डॉ. अपर्णा कुटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षिका क्षीरसागर यांनी केले तर संचालन अंगणवाडी सेविका चंदा चिंचोलकर यांनी केले. आभार अनुसया वंडाळे यांनी मानले. कार्यक्रमाला पर्यवेक्षिका रेखा वानखडे, अर्चना वावगे, गीता मानगावकर, सुनिता वानखडे यासह जामोद बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच माता पालकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0 9 5 4 9 7
Users Today : 223
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *