गायक मेघानंद जाधव यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

KHOZ MASTER
2 Min Read

साखरखेर्डा:-विशेष प्रतिनिधी 

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साखरखेर्डा येथील एसईएस हायस्कूलच्या मैदानावर गायक मेघानंद जाधव यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव काटे महाराज तर प्रमुख उपस्थितीत केंद्रीय आरोग्य व आयुष मंत्री प्रतापराव जाधव, बाबुराव मोरे, ठाणेदार गजानन करेवाड, रामदाससिंग राजपूत, अमित जाधव, अशोक इंगळे, दिलीप बेंडमाळी, दिलीप खंडारे, आयुब कुरेशी, अहमद कुरेशी, कैलास ढोलेकर हे होते. जिजाऊ, सावित्री, रमाई होऊन समाज घडविण्याचे काम महिलांनी केले पाहिजे. जिजाऊ माँ साहेब यांनी शिवबाच्या हाती सोन्याचा नांगर देऊन उजाड पुणे घडविण्याचे धडे दिले. तर सावित्रीबाई फुले यांनी हातात पुस्तक घेऊन महिलांना शिक्षणाची दारे खुली केली. रमाबाई आंबेडकर यांनी स्वतः उपाशी राहून बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली. त्यांचे कार्य समाजासमोर मांडले पाहिजे. तर या मातांची किंमत कळेल, हे आपल्या गितातून मेघानंद जाधव यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोनच राजे होऊन गेले, या गीताच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य कसे उभे केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून संविधानाची निर्मिती कशी केली, त्याचा फायदा बहुजन समाजाला कसा झाला, याचा उलगडा केला. महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराजांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही, असे प्रबोधन ना. जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश ठोके, उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष गवई, उपाध्यक्ष अरुण गवई, दर्शनकुमार गवई, बी. के. गवई, दिलीप इंगळे, संदीप खिल्लारे, गजानन गवई, सुमित गवई, ईश्वर गवई, विजय कंकाळ, मिलिंद गवई, राहुल गवई, यश इंगळे, किरण गवई, पंकज गवई यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *