निमा वुमन फोरमच्या कार्यकारी समितीवर डॉ. सोनाली मुंदडा

Khozmaster
1 Min Read

लोणार:-तालुका प्रतिनिधी 

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य निमा वुमन फोरमच्या कार्यकारी समितीवर डॉ. सोनाली मुंदडा यांची निवड करण्यात आली आहे.येथील २५ वर्षापासून वैद्यकीय सेवा देणारे डॉ. राजेश मुंदडा व डॉ. सोनाली मुंदडा सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असतात. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असणारे दांपत्य म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. आयुर्वेदिक डॉक्टर मंडळीसाठी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य ही संघटना असून त्यामध्ये ‘निमा वुमन कोरम’ महिला डॉक्टरांची संघटना आहे. या संघटनेची नुकतीच नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये कार्यकारी मंडळावर सात महिला डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये लोणार मधील डॉ. सोनाली राजेश मुंदडा यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत लातूर, मिरज, बुलढाणा, सोलापूर, अकोला, नागपूर या ठिकाणच्या महिला डॉक्टरांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.

0 9 5 4 9 7
Users Today : 223
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *