डोणगाव:-तालुका प्रतिनिधी
समृद्धी महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा ठरला आहे. अपघातांची मालिका सुरुच आहे. आतापर्यंत अनेक बळी गेले असून, अनेकजण जायबंदी झाले आहेत. पुन्हा एकदा २३ एप्रिलच्या सकाळी सव्वासहाच्या सुमारास इर्टिगा कारला अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने कार उलटून दुभाजकाला धडकली. नंतर तीस मीटरपर्यंत घासत जावून पुलाच्या कडठ्यावर आदळली. या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, तीनजण गंभीर जखमी झाले. नागपूर कॉरीडोर चॅनेल नंबर २९९.१ वर हा अपघात झाला. ठाणे (मुंबई) येथील रहिवासी विकास कुमार (२८), गुड्डू सिंग (२८), प्रदीप सुरेश चव्हाण (३८), मनीष कुमार प्रेमचंद सिंग (२८) व नितेश कुमार (२८) हे नव्यानेच घेतलेल्या इटिंगा कार क्रमांक एमएच-०४-एमएच-८८०८ ने नागपूर कॉरीडोरने बिहारकडे जात होते. २३ एप्रिलच्या सकाळी सव्वासहा वाजता सुलतानपूरजवळ चॅनेल नंबर २९९.१ वर चालकाला डुलकी लागली. त्यामुळे अनियंत्रित कार दुभाजकाला धडकली. तीस मीटर घासत जावून जावून समोर असलेल्या पुलाच्या कठड्यावर आदळली. या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला. चालक विकास कुमारसह समोर बसलेला गुड्डू कुमार जागीच ठार झाला. तसेच प्रदीप चव्हाण, मनीष कुमार व नितेश कुमार हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.
Users Today : 223