दोन दुचाकींमध्ये धडक तरुण ठार, एक गंभीर

Khozmaster
1 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

खामगाव-जालना बायपासवरील पुंडलिकनगर कमानीजवळ २८ एप्रिलच्या दुपारी साडेबारा वाजता दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन एक तरुण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.पृथ्वीराज अजय सुरडकर (वय १९) असे मृत युवकाचे नाव असून, तो सोमठाणा येथील रहिवासी होता. तसेच ओम प्रकाश इंगळे हा गंभीर जखमी झाला आहे. ओम इंगळे हा युवक पुंडलिकनगरहून त्याची दुचाकी (क्रमांक एमएच-२८-एई-४२२१) ने महामार्गावर येत होता. त्याचवेळी पृथ्वीराज सुरडकर त्याच्या दुचाकी (क्रमांक एमएच-२१सीई-६७५९) ने जात असताना दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की पृथ्वीराज गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गंभीर जखमी ओम प्रकाश इंगळे याला तातडीने जवंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.या घटनेची माहिती मिळताच आरटीओ अधिकारी निखिल ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आपल्या वाहनातून जखमींना रुग्णालयात पोहोचवले. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना तातडीने उपचार मिळू शकले. तसेच दत्ता सुसर यांनीही जखमींना मदत केली. मृत पृथ्वीराज हा आखाडे हॉस्पिटलमध्ये काम करत होता. तो आपल्या कामासाठी बाहेर गेला असताना हा दुर्दैवी अपघात घडला.त्याच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

0 9 5 4 9 7
Users Today : 223
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *