दुचाकी बसवर धडकली; युवक गंभीर एसडीपीओ कदम यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव:-तालुका प्रतिनिधी 

भरधाव वेगातील दुचाकी समोरून येणाऱ्या एसटी बसवर धडकल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. चिखली रोडवरील अंत्रज फाट्यावर २८ एप्रिल रोजी ही घटना घडली.शिवशाही बस (क्रमांक एमएच-०९-एमई-१३०१) अकोला येथून पुणे येथे जात असताना अंत्रज फाट्यानजीक वळणावर समोरून भरधाव वेगात येणारी दुचाकी बसवर जोरात धडकली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी बसचालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी जखमी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *