आरोग्यवर्धक वाळ्याचा पडला विसर !

Khozmaster
2 Min Read

डोणगाव:-तालुका प्रतिनिधी 

पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा उपयोग व फायदा जाणून घेतला होता. विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये त्याचा उपयोगसुद्धा केल्या जात असे. त्या औषधी वनस्पतीचा फायदा व महत्त्व अबाधित राहायला हवे, हा त्या मागचा उद्देश होता. अक्षय्य तृतीयेला लागणारा वाळी हा गवतवर्गीय वनस्पती आहे. तिचे असंख्य फायदे आहेत. मात्र सध्या बाजारात असूनसुद्धा त्याला मागणी कमी आहे. ही वनस्पती कमी दिसून येत आहे. साध्या त्याचा सर्वांना विसर पडल्याचे दिसून येत आहे. साडेतीन मुहूतपैिकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण आलेला आहे. पितरांच्या शांतीसाठी पूर्वजांचा आशीर्वाद मिळावा, हा त्यामागचा हेतू आहे. या सणाला पूजेच्या वेळी माठाच्या पाण्यात वाळा (खस) घालण्याची प्रथा आहे. त्यामुळे धार्मिकतेबरोबरच आरोग्यविषयक बाबींमुळे वाळाला बहुमूल्य असे महत्त्व प्राप्त झाले आहे.गवतासारखा दिसणारा वाळा हा पित्त व कफनाशक आहे. दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी या विकारांवर उपयुक्त आहे. वाळा जाळून धुरी घेतल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते. उन्हाळी लागल्यास वाळ्याचे चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर घेतल्यास आराम मिळतो. थकवा कमी करण्यासाठी वाळ्याचे सरबत उत्तम असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. वाळा ही बहुवार्षिक गवतवर्गीय वनस्पती असून व्यापारीदृष्ट्या या वनस्पतीच्या मुळातील सुगंधी तेलाला मोठी मागणी आहे. या सुगंधी तेलाचा वापर अत्तर, सौंदर्य प्रसाधने, साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. वाळ्याच्या मुळांचा वापर चट्या, पंखे, टोप्या बनविण्यासाठी करतात. जलसंधारणासाठी व जमिनीची धूप थांबवण्याकरिता शेताच्या बांधावर, उताराला वाळा (खस) गवताची लागवड केली जाते. त्यामुळे वाळा वनस्पतीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. असे असताना सध्या मात्र कित्येक ठिकाणी अक्षय्य तृतीयेसाठी वाळा वनस्पतीची मागणी असते. मात्र वाळा विकल्या जात नसल्याने पूर्वीप्रमाणे त्याचे विक्रेते विकायला आणत नसल्याचे दिसून येते.वाळासारखे औषधी वनस्पतीचे धार्मिक सोबतच आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याने माठाच्या पाण्यात वाळा टाकल्याने त्या पाण्याचा आरोग्यासाठी भरपूर फायदा आहे. मात्र आज प्रत्येक घरात असणाऱ्या फ्रिजने माठाचे महत्त्व कमी केले. सोबतच वाळ्यासारख्या औषधी वनस्पतीचे सुद्धा महत्त्व कमी झाल्याचे बाजारात दिसत आहे.

0 9 5 4 9 7
Users Today : 223
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *