टिप्पर-ट्रॅक्टरमध्ये धडक; चालक गंभीर जखमी

KHOZ MASTER
1 Min Read

संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी 

ट्रॅक्टर व टिप्परमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून चालक गंभीर जखमी झाला. तालुक्यातील पातुर्डा फाटा ते वरवट बकाल मार्गावर मनार्डी फाट्याजवळ आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला.एमएच-२८-बीबी-६६८५ क्रमांकाचा टिप्पर शेगावकडून वरवट बकालकडे जात होता. तर एमएच-२८-बीक्यू-४८१९ क्रमांकाचा टॅक्टर शेतीची मशागत करून वानखेडकडे जाण्यासाठी रोडवर येत होता. त्याचवेळी धडक होऊन दोन्ही वाहने उलटली. ट्रॅक्टरखाली दबून चालक सुरेश रामेश्वर रावणकार गंभीर जखमी झाले. जवळच असलेल्या जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टर हटविण्यात आले आणि जखमी रावणकार यांना रुग्णालयात हलविण्यात आले. शेगाव येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अकोला येथे हलविण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *