खैरवच्या श्रद्धाने केएसएस शूटिंग ट्रायल्समध्ये गाठला गुणांचा उच्चांक

KHOZ MASTER
1 Min Read

मलकापूर पांग्रा:-विशेष प्रतिनिधी 

येथून जवळच असलेल्या खैरव येथील श्रद्धा विजय टाले या १३ वर्षाच्या मुलीने बाजीप्रभू देशपांडे शूटिंग रेंज आर्मी कॅम्प छत्रपती संभाजी नगर येथे केएसएस शूटिंग ट्रायल्समध्ये चमक दाखवत दहा मीटर पिस्तूल टायर्समध्ये ६००/५६० गुण मिळवून सर्वांनाच प्रभावित केले.प्रशिक्षक एनआयसी कोच सागर निमसे, दिगंबर गीते यांच्याकडून आर्मी कॅम्प संभाजीनगर येथे प्रशिक्षण घेऊन तिने सहजपणे पात्रता मिळवली. तिच्या वयापेक्षा जास्त लक्ष केंद्रित आणि आपले कौशल्य दाखवले. तिला आता शूटिंग सर्किटमध्ये एक उगवता तारा म्हणून पाहिल्या जात आहे. तीची ट्रायलसाठी निवड झाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *