आदर्श पत्रकार पुरस्काराने सिद्धार्थ तायडे सन्मानित

KHOZ MASTER
1 Min Read

नांदुरा:- तालुका प्रतिनिधी 

जनहित फाउंडेशन, महाराष्ट्रच्या तिसऱ्या वर्धापनदिनी संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार उमेश जामसडेकर यांच्या हस्ते युवा पत्रकार स्तंभलेखक सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.अखिल भारतीय कीर्तन संस्था मांगल्य सभागृह (मुंबई) येथे २८ एप्रिलला पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन पँथर भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी केले. यावेळी विचार पिठावर मधुवती पेठे, अजित देशमुख, ऋतुजा दुबे, राजेंद्र लंकेश्री हे उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील संगीत, कलावंत, क्रीडा, पत्रकार, साहित्यक, कवी, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, अशा विविध क्षेत्रातील जवळपास ५० पेक्षा जास्त मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सुत्रसंचालन इंदुमती पेठे तर आभार महेंद्र वाघमारे यांनी मानले. तालुक्यातील वडनेर भोलजी येथील युवा पत्रकार सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल अॅड. संतोष तायडे, शांताराम बेलोकार, कोषाध्यक्ष योगेश धोटे, सुरेश पेठकर यांनी त्यांचा सत्कार केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *