धाड:-विशेष प्रतिनिधी
सर्व सभासदांना व ग्राहकांना बँकेच्या विविध ठेव योजना, कर्ज योजनांबाबत, तसेच बँकेत चालणाऱ्या कामकाजाबाबत ग्राहक सभासदांना सखोल माहिती असणे, या उद्देशाने आपल्या बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक मेळावा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महालक्ष्मी व सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करून बँकेचे सल्लागार प्रदीप देशपांडे यांनी बँकेचा इतिहास, बँकेचे अध्यक्ष व कार्यक्रमास लाभलेले प्रशिक्षक व्यंकटेश कुलकर्णी यांचा परिचय दिला. अध्यक्षीय भाषणात सतीश गप्त यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून बँकेच्या वेगवेगळ्या योजनांचे आणि बँकेच्या सद्यस्थितीबाबत सर्व ग्राहकांना माहिती दिली. या प्रसंगी बँकेचे संचालक मनोहर खडके, राजेंद्र शेटे, बँकेचे सरव्यवस्थापक शशांक पंधाडे, सल्लागार नईम खान, प्रदीप देशपांडे, डॉ. विष्णू वाघ, डॉ. बोरसे, कि. शा. सरोदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. धाड ग्रामपंचायतच्या सरपंच सावित्रीबाई बोर्डे, बँकेचे सभासद देविदास जाधव, श्रीरंग येंडोले, डीगांबर जाधव, टीका खान, शकील सौदागर, सोहील सौदागर, खालिद खान, तुळशीराम काळे, राम सपकाळ, प्रकाश राऊत, पंडित राऊत, डी. एन. सपकाळ तसेच अनेक सभासद व ग्राहक मेळाव्यात उपस्थित होते.सल्लागार नईम शेठ यांनी बँकेच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. अशा शब्दांत बँकेच्या सेवेबद्दल आभार मानले. किरण सरोदे, पंडित राऊत, अंझर सौदागर आदी ग्राहकांनी यावेळी झालेल्या चर्चा सत्रात भाग घेतला. सत्रसंचालन डॉ बोरसे साहेब यांनी; तर उपस्थितांचे आभार प्रदीपकाका देशपांडे यांनी मानले, त्यानंतर उपस्थित सर्वांना नास्ता वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी मुख्यालय शाखाधिकारी श्री संजय जामदार साहेब, धाड शाखेचे शाखाधिकारी योगेश ताठे व सर्व कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला.
Users Today : 1