सेवा हक्कदिनी तहसील कार्यालयात आदर्श आपले सरकार सेवा केंद्र सुरू

KHOZ MASTER
1 Min Read

नांदुरा:- तालुका प्रतिनिधी 

सेवा हक्क दिनाची सुरुवात २८ एप्रिलला झाली. त्या दिनाच्या दशकपूर्तीचे औचित्य साधून तहसील कार्यालय नांदुरा येथे आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन तहसीलदार दिगंबर मुकुंदे यांच्या हस्ते पार पडले.राज्य सेवा हक्क आयोग अमरावतीच्या ४ एप्रिल २०२५ पत्रानुसार ज्या तालुक्याच्या ठिकाणी नवीन तालुका प्रशासकीय इमारत तयार झाली असेल, त्या ठिकाणी आदर्श आपले सरकार सेवा केंद्र २८ एप्रिलला सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार तहसील कार्यालयाच्या खोली क्रमांक १ मध्ये आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे, आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक हेलगे यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सेतू केंद्रामध्ये मोठ्या आकारात स्पष्टपणे भाव फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांनी पैसे दिल्याची पावती घ्यावी. केंद्रामार्फत कुठल्याही प्रकारचा जास्त आकार शुल्क आकारल्या जाणार नाही, याची ग्वाही तहसीलदार डीगाबर मुकुंदे यांनी दिली. या ठिकाणी सर्व प्रकारचे दाखले उपलब्ध होणार असून लोकांना इतरत्र भटकावे लागणार नाही. अधिकृत पत्रकारांना ही सेवा वर्षभर मुफ्त देण्यात येणार आहे. परंतु त्याकरिता ओळखपत्र दाखविणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *