मोताळा:- तालुका प्रतिनिधी
वारकरी संप्रदाय संस्काराची युनिव्हर्सिटी आहे. पंढरी पांडुरंग परमात्मा वारकऱ्यांचे आराध्य तर ज्ञानोबा तुकोबा माय बाप आहे. वारकरी परंपरेतील संतांचा विचार संपूर्ण मानव जातीच्या उत्थानाचा कल्याणाचा महामार्ग आहे, असे प्रतिपादन वारकरी भूषण हभप वासुदेव महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले.मोताळा तालक्यातील वाघजाळ आश्रम येथे २६ एप्रिलला वारकरी परिषदेच्या वार्षिक आढावा बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रबोधनकार हभप अॅड. सतीशचंद्र रोठे, जिल्हाध्यक्ष हभप गजानन महाराज गायकवाड, कार्याध्यक्ष हभप प्रल्हाद राऊत, हभप निनाजी महाराज खोडके, हभप मेधाताई सैतवाल, हभप विठ्ठल खाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्ञानोबा तुकाराम वंदन करून मंगल घेत आढावा बैठकीला सरुवात झाली. बैठकीमध्ये पंढरपरची वारी, वारकरी परिषदेतील ठराव, बाल संस्कार शिबिर, वारकरी परिषदेच्या नियुक्ती, यासह वारकरी धर्म, संस्कार, संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने विविध ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले. तर जिल्ह्यातील निःस्वार्थ धर्म कार्य करणाऱ्या वारकऱ्यांना पदोन्नती देत नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यशस्वीतेसाठी वारकरी साहित्य परिषदेचे हभप गजानन थिगळे, उत्तमसिंग बोराडे, गोविंदा शिंबरे, विनायक पाटील, गजानन खाकरे, कल्पना शेळके, आशाताई बोराडे, लताबाई शेळके यांच्यासह जिल्ह्यातील शहर तालुका अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. वार्षिक आढावा बैठकीला जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी प्रामख्याने उपस्थित होते.
