माजी विद्यार्थ्यांचा २५ वर्षांनंतर पार पडला स्नेहमेळावा

KHOZ MASTER
1 Min Read

मासरूळ:-विशेष प्रतिनिधी 

स्थानिक शिवाजी हायस्कूलच्या सन २००१-२००२ वर्षी इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मासरुळ येथील शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर उत्साहात पार पडला. यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला. काहींनी आपल्या आनंदाश्रूना वाट मोकळी करून दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्याध्यापक एस.पी. नगराळे तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक जाधव, पवार, रत्नपारखी, सोनवणे, आळेकर, व्हि.टी सोनूने व जामनिक हे होते. आपले वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून चाळीशी – पंचेचाळीशीकडे झुकलेले हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने या मेळाव्याला एकत्र जमले. अनेक वर्षांनंतर आपण एकत्र भेटत आहोत, त्यामुळे ओळख लागते की नाही, ही मनातील भावनाही होतीच. पण एकत्र आले आणि सर्वांनीच गळाभेट घेतली. कार्यक्रमाचे नेटके संयोजन माजी विद्यार्थी व आजचे शिक्षक योगेश घुले, दिनेश कापरे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक नगराळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थी घडविण्याचा आनंद व्यक्त केला व त्यांच्या हातून मासरूळ येथील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर पोहोचल्याचा आनंद व्यक्त केला. प्रास्ताविक दिनेश कापरे यांनी केले. विलास भगत यांनी अहवाल वाचन केले. योगेश घुले यांनी सूत्रसंचालन तर आभार दिनेश कापरे यांनी मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *