बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक मान्यताप्राप्त असलेला लेक्रॉस राष्ट्रीय स्पर्धा आग्रा येथे होत असून या स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस बॉईज खेळाडू नुकतेच रवाना झाले.आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक मान्यताप्राप्त असलेला लेक्रॉस खेळ हा सन २०२८ च्या ऑलिंपिक खेळामध्ये समाविष्ट असलेला खेळ असून लेक्रॉस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली उत्तर प्रदेश लेक्रॉस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरी लेक्रॉस राष्ट्रीय ज्युनिअर अँड सिनियर स्पर्धा २९ एप्रिल ते १ मे २०२५ ला जॉन मिल्टन पब्लिक स्कूल (आग्रा) येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील सागर बोर्डे, राहुल चांदणे, अनिस शेख, सिद्धेश्वर सोळंकी, पार्थ जोक तसेच सोहील रेघिवाले आणि ज्युनिअर गटामध्ये शिवराज निळे, आर्यन गिरी, अर्शद शेख, कैफ शेख, आशिष आंधळे, समीर चौधरी, केयुर पवार यांची महाराष्ट्र राज्य संघात सिनियर गटामध्ये निवड झाली असून खेळाडून स्पर्धेसाठी रवाना झाले.यावेळी महाराष्ट्र लेक्रॉस असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सुमेधा ठाका, सचिव डॉ. मोहद बाबर, लेक्रॉस असोसिएशन ऑफ बुलढाणा जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा ज्योती निळे, सचिव दिपक माठे, निलेश इंगळे, प्रकाश करंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोढे, राखीव पोलीस निरीक्षक तिडके, एएसआय नसीम मिर्झा, पोलीस हवालदार शरद गिरी, नंदू आंधळे, डीआय मुतलीफ शेख यांची उपस्थिती होती.
Users Today : 1