मलकापूर:- तालुका प्रतिनिधी
मलकापूरच्या मातीतून उगवलेल्या एका तेजस्वी ताऱ्याने आपल्या कर्तृत्वाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. डॉ. धनंजय मुरलीधर खर्चे यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमधून (एम्स, दिल्ली) एमबीबीएस आणि एमएमसी दिल्लीमधून एमडी मेडिसिन पूर्ण केले. यापूर्वीच चापीय व्यानी आपल्या बुद्धिमतेचा सुपर स्पेशालिटी प्रवेशासाठी संपूर्ण भारतातून ३९ वा क्रमांक मिळवत एक नवा इतिहास रचला आहे.या अभूतपूर्व यशाबद्दल माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार राजेश एकडे, लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अरविंद कोलते, पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते, इंजिनीअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते डॉ. धनंजय खर्चे यांचा सत्कार करण्यात आला. हा सोहळा मलकापूरच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण ठरला.वडिलांच्या स्मृतींना उजाळा सत्कारादरम्यान सर्व मान्यवरांनी धनंजय यांच्या वडिलांबद्दल भावपूर्ण आठवणी सांगितल्या. धनंजय यांचे बडील, ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ होते. त्यांनी कमी वयात मलकापूर आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवली. त्यांचा हा वारसा धनंजय यांनी अत्यंत समर्थपणे पुढे नेला आहे. धनंजय यांचे हे यश पाहून त्यांच्या वडिलांची आठवण झाली. धनंजय यांना वैद्यकीय क्षेत्रात आणखी उंच भरारी घेण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी धनंजय यांच्या मेहनतीचे आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रेरणादायी प्रवासाचे कौतुक केले.धनंजय यांनी वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांचा वारसा जपला आहे. या यशाने मलकापूरसह संपूर्ण विदर्भाचे नाव उंचावले आहे. ‘मी माझ्या वडिलांचा आदर्श आणि आईच्या प्रेरणेने पुढे चाललो आहे. माझे ध्येय आहे की, मलकापूर आणि सेवा द्याव्यात,’ असे धनंजय यांनी सत्कार समारंभात सांगितले.प्रेरणादायी जीवनप्रवास धनंजय यांचा जीवनप्रवास म्हणजे जिद्द, मेहनत आणि संकटांवर मात करण्याची एक प्रेरणादायी गाथा आहे. वयाच्या अवघ्या एका महिन्याचा असताना त्यांनी आपले वडील गमावले. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या आईने अत्यंत खंबीरपणे धनंजय आणि त्यांची बहीण प्राजक्ता यांना सांभाळले. एकट्या आईने मुलांना केवळ शिक्षणच दिले नाही, तर त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. प्राजक्तानेही एमबीबीएस आणि एमएस पूर्ण करत वैद्यकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. तिचे लग्न शिर्डी, कोपरगाव येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संकेत मुळे यांच्याशी झाले. डॉ. संकेत मुळे हे स्वतः हृदयरोग क्षेत्रातील एक नावाजलेले नाव आहेत. धनंजय आणि प्राजक्ता यांच्या यशामागे सगळ्या आप्तस्वाकियांचे प्रेम आहे तसेच मलकापूर आयएमए परिवारातील सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.
Users Today : 1