बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेक आजार वाढले आहेत. अशा आजारांवर संगीत खूप लाभदायक ठरू शकते. डायबिटीस, हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर, अस्थमा या सारख्या आजारांचे मूळ मनामध्ये आहे. हे सर्व आजार मनोकायीक आजार आहेत. या सर्व आजारांनी वर वेगवेगळे उपचार व थेरपी उपलब्ध आहेत. टाकळकर गुरुजीनी बुलढाणा शहरात विद्यार्थ्यांवर संगीताचे संस्कार करत असतानाच एक कलासंपन्न पिढी घडविण्यास सोबतच बुलढाण्यातील रसिक घडवण्याचे काम देखील केले, असे मत डॉ. गणेश गायकवाड यांनी व्यक्त केले.रा.गो. टाकळकर गुरुजी स्मृती संगीत समारोहात ते बोलत होते. प्रारंभी टाकळकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी नलिनी वरणगावकर डॉ. ऋतुजा कोल्हे स्वर साधना संगीत विद्यालयाचे संचालक अरविंद टाकळकर यांची उपस्थिती होती गेल्या १४ वर्षापासून बुलढाणा शहरात टाकळकर गुरुजी यांच्या स्मृतीनिमित्त संगीत समारोहाचे आयोजन केले जाते. यावर्षी स्वातंत्र्यसैनिक रमेशराव भाऊराव पाटील यांच्या स्मरणार्थ रा.गो. टाकळकर गुरुजी स्मृती संगीत सेवा पुरस्कार बुलढाण्यातील जेष्ठ संगीत शिक्षिका कीर्तनकार नलिनी वरणगांवकर यांना स्वरसाधना संगीत विद्यालयाचे अरविंद टाकळकर डॉ. गणेश गायकवाड, मीना पाटील यांनी प्रदान केला. स्मृतीचिन्ह शाल व रोख पाच हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.याप्रसंगी बोलतांना नलिनी वरणगांकर यांनी ज्येष्ठ संगीत शिक्षक स्व. ला. मो. पवार गुरुजी व अण्णासाहेब बर्दापूरकर यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या केंद्र व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल रविकिरण मोरे यांचा सत्कार करण्यात आला. संगीत विशारद परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या अश्विनी कोडोलकर, आदिती खरात, स्वराली देशपांडे, शारदा विरशिद यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर डॉ. ऋतुजा कोल्हे, चंद्रशेखर कोल्हे यांची शास्त्रीय संगीत व उपशास्त्रीय संगीताची मैफल पार पडली. डॉ. ऋतुजा कोल्हे यांनी ओम नमः शिवाय, ध्यान लागले रामाचे, जयशंकर गंगाधरा, राधा घर मिलींद जयजय तर चंद्रशेखर कोल्हे यांनी इंद्रायणी काठी, राम रंगी रंगले, कानडा राजा पंढरीच्या असे भक्तीगीत अभंग गाऊन मैफालीत रंगत आणली. मैफलीसाठी संवादिनीवर कैलास कोल्हे, तबल्यावर राम जाधव, महेश बाहेकर यांची तर तानपुंयावर अनिता कोल्हे, शुभांगी लहाने यांची साथ संगत लाभली होती. सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी, प्रास्ताविक व आभार रविकिरण टाकळकर यांनी मानले.यावेळी राधेशाम चांडक, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, शीलाताई पाटील, डॉ. सदानंद देशमुख, डॉ.एस.एम.कानडजे, कर्नल सुहास जतकर उपस्थित होते. आयोजनासाठी मीना पाटील, अविनाश टाकळकर, अनुप टाकळकर, निशाद टाकळकर, पियुष टाकळकर, शार्दुल सोनुने, प्रा. रविकिरण मोरे, मारोतराव मानकर, अमित पाटील, धीरज उबरहंडे, शिवानी पाटील, हर्षल तायडे, नितीन देशमुख यांनी परिश्रम घेतले.
