ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खाते संलग्न करा

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

जिल्ह्यातील ४ हजार २९० शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि ४ हजार ७०५ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उपरोक्त शेतकरी सन्मान निधीपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागाच्या कृषि उपसंचालक अनुराधा गावडे यांनी केले.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र शासनाकडून वार्षिक सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री र किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ७ वा हप्ता जुलै २०२५ च्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे. परंतु जिल्ह्यातील ४ हजार २९० शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि ४ हजार ७०५ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यासाठी ई- केवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक असून बँक खात्याशी किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करण्याचे काम तत्काळ पूर्ण करून घ्यावे. यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक, गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे बुलढाणा यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *