सुरेश काळे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान

Khozmaster
3 Min Read

सोयगाव, प्रतिनिधी ; गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यातील टिटवी,देव्हारी येथील विविध शासकीय योजना राबविण्यात व समाजपयोगी केलेल्या कार्याची दखल घेत सोयगाव तालुक्यातील देव्हारी येथील ग्रामसेवक सुरेश गणेशराव काळै यांना आर्दश ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील तापडीया नाट्य मंदीरात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांच्या हस्ते चव्हाण यांना पुरस्कार प्रदान करत सपत्नीक सत्कार करण्यात आला.पुरस्कार वितरण प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना तसेच बदलून गेलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश गटणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देसले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, ग्रामविकास विभाग मंत्रालय ओएसडी डॉ सुनिल भोकरे, केन्द्र उप मुख्य कार्यकारी अधिकारी( पं) गट विकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, विजय परदेशी,मा.शिवाजी केंद्रेकर औरंगाबाद, मा.सुदर्शन तुपे सामान्य प्रशासन औरंगाबाद, मा देसले साहेब पाणीपुरवठा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना जिल्हा अध्यक्ष भिमराज दाणे पाटील, सरचिटणीस प्रविण नलावडे, ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन रमेश मुळे, एस एस सोनवणे, आर.डीं चौधरी, विस्तार अधिकारी संतोष दारकुंडे व जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य शासनाच्या निर्णयनानुसार ग्रामविकास, ग्रामस्वच्छता, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य विकास योजना, उपक्रम, मिळकत कर वसुली, अशा सर्व पातळ्यावर सर्वोत्कृष्ठ काम करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामसेवकांची निवड करण्यात येते. सन २०२१-२२ मध्ये या पुरस्कारासाठी सुरेश काळे यांची निवड करण्यात आली.

ग्रामसेवक काळे सध्या सोयगाव तालुक्यातील ग्रा.प.देव्हारी, टिटवी आणि कार्यरत आहेत. काळे हे कृषीपदवीधर असून,सुरेश काळे पिंपळगाव उंडा ता.मेहकर जि.बुलढाणा असून ग्रामसेवक म्हणून सेवेस सुरुवात केली. त्यांनी देव्हारी ,पिंपळवाडी २००९ येथे केली होती. नंतर सावळदबारा, नादातांडा, डाभा,जामठी, टिटवी व देव्हारी आदी गावात काम करून गावातील प्रत्येक माणूस केंद्रस्थानी मानून विविध योजना व विविध उपक्रम राबविले. याची कामाची दखल घेत प्रशासनाने त्यांना हा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.काळे यांनी ग्रा.प.देव्हारी अतिक्रमण विरोधी मोहीम, वृक्षारोपण, स्वच्छता, अरोग्य, शिक्षण तसेच आजादी का अमृत महोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर असे विविध देव्हारी व टिटवी मधे उपक्रम राबविले आहेत.

तसेच सरपंच समीरखाँ तडवी, उपसरपंच उत्तम चव्हाण यांनी पुरस्कार योजनेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान देव्हारी या ग्रामपंचायतीने पटकावला आहे.

देव्हारी या गावाचे नाव औरंगाबाद जिल्ह्यमधे उज्वल केल्यामुळे त्यांच्यावर मान्यवरांनी शुभेच्छा वर्षाव होत असून सोयगाव व सावळदबारा परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,प्रदीप पाटील, सुरेखा पवार, एस.ए.रणजिते, सौ.कल्पना सुरेश काळे, मयूर सुरेश काळे,उपसरपंच उत्तम चव्हाण, सरपंचपती भागवत जाधव, सरपंचपती सुरेश चव्हाण, प्रा.जिवन कोलते, उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान, शालेय समितीचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत, पत्रकार रहीमखाँन, जब्बार डी.तडवी, शिक्षकवृंद, ग्रामविकास अधिकारी सोयगाव, महेशसिंह ठाकूर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *