आईला मारहाण करणाऱ्या बापाची लेकाकडून हत्या लोणी गुरव येथील घटना, आरोपी मुलगा अटकेत

Khozmaster
2 Min Read

खामगाव:- तालुका प्रतिनिधी 

दारुच्या आहारी गेलेला आप दारूच्या नशेत दररोज आईला मारहाण करुन त्रास द्यायचा. आईला होणारा त्रास पाहवल्या जात नसल्याने राग अनावर झालेल्या लेकाने बापाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून यमसदनी धाडले. तालुक्यातील लोणी गुरव येथे २९ एप्रिलच्या सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी मुलगा धनंजय गोरख हिवराळे (वय २५ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. लोणी गुरव (ता. खामगाव) येथील रहिवासी असलेले गोरख हिवराळे (वय ५५ वर्षे) यांना दारुचे व्यसन चांगलेच जडलेले होते. दारूची नशा करुन गोरख हा रोज वाद घालून आपल्या पत्नीला मारहाण करायचा. आपल्या जन्मदात्या आईला दारूडा बाप रोज मारतो, याची मुलगा धनंजयला चीड येत होती. अनेक दिवस त्याने हा त्रास सहन केला. अखेर त्याच्या संयमाचा बांध फुटला. त्याने बापाला कायमचे संपवायचे मनोमन ठरविले. २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा धनंजय हिवराळे याने दारूच्या नशेत निपचित झोपलेल्या आपल्या बापावर लाकडी दांड्याने दणादण वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गोरख हिवराळे यांचा मृत्यू झाला.दरम्यान, आज ३० एप्रिलच्या सकाळी ही घटना उघडकीस आली. गोरख हिवराळे हा राहत्या घरात अंथरुणावर मृता अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती लोणी गुरव येथील पोलीस पाटील व अन्य नागरिकांनी खामगाव ग्रामीण पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांना खामगाव ग्रामीणचे ठाणेदार यांनी घटनेची प्राथमिक माहिती दिली. त्या पाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसाह लोणी गुरव गावात दाखल झाले होते. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलास ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या निघृण हत्येने लोणी गुरव गाव हादरले असून गावावर शोक कळा पसरली आहे.

0 9 5 4 9 9
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *