संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील तामगाव येथिल शेतकरी प्रकाश ज्ञानदेव तायडे यांच्या बोडखा शिवारातील गट नंबर ४० येथील गोठ्याला २९ एप्रिलच्या रात्री १ वाजता लागलेल्या आगीत गुरांसाठी साठवून ठेवलेला १२ ट्रॉली कुटार, स्प्रिंकर सेट, डाले, ताडपत्री व अन्य शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे शेतकऱ्याचे २ लाख रूपयांचे नुकसान झाले.तामगाव पोलीस स्टेशन हद्दित येणाऱ्या बोडखा शिवारात गट नंबर ४० मध्ये प्रकाश तायडे यांची शेती असून शेतात गोठा आहे. या गोठ्यात शेतकरी तायडे यांनी गुरांसाठी १२ ट्रॉली कुटार साठवून ठेवले होते. तसेच स्प्रिंकर सेट, डाले, ताडपत्री व अन्य शेतीपयोगी साहित्य गोठ्यात ठेवलेले होते. २९ एप्रिलच्या मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास त्यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. गोठ्याला आग लागल्याचे कळताच शेतकरी तायडे व त्यांचे कुटुंब, तामगावातील तरुण, नागरिक व शेतकऱ्यांना तायडे यांच्या शेतात धाव घेतली. आपापल्या परिने सर्वांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने चौफेर क्षेत्र व्यापल्याने काही केल्या आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून जळगाव जामोद नगरपालिकेचे अग्निशामक वाहन पाचारण केले. फायरमॅन अनिल मिसाळ व अग्निशामक कर्मचारऱ्यांच्या अथक परीश्रमामुळे आगीवी नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोवर गोठ्यातील १२ ट्राली कुटार, ३ ताडपत्री, डाले, स्प्रिंकलर पाईप व शेती उपयोगी साहीत्य जळून राख झाले. महसूल व पोलीस विभाने घटनेचा पंचनामा केला असून शासनाने संबंधित शेतकऱ्यास आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
Users Today : 1