बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सन २०२३-२०२४ च्या खरीप आणि रब्बीच्या हंगामातील ४५३ कोटी रुपयापैकी ४२९ कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. उर्वरित २४ कोटी रुपये खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर सन २०२४-२०२५ हंगामातील पीक विम्याचे १४४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर उर्वरित निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना दिशा समितीच्या बैठकीत दिली.बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात केंद्र पुरस्कृत योजनेचा आढावा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज २९ एप्रील रोजी घेण्यात आला. त्यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची स्थिती मंत्री महोदयांनी जाणून घेतली. त्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी २०२३-२०२४ वर्षात खरीप आणि रब्बी हंगामा अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना ४५३ कोटी रुपयांचा पीक विमा रक्कम मंजूर झाला होता. त्यातील ४२९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. उर्वरीत २४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खाते आधार लिंक व इतर कारणांमुळे जमा झाले नव्हते, ते पैसेही आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. शिवाय सन २०२४-२०२५ खरीप हंगामात १४४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात ही पीक पैसे जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी दिली.
Users Today : 5