दिलीपराव नाफडे यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान

Khozmaster
2 Min Read

दाताळा:-विशेष प्रतिनिधी 

सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव नाफडे यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन येथे २७ एप्रिल २०२५ रोजी आयोजित समारंभात हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन युवक कल्याण मंत्रालय, नीती आयोग, एमएसएमई व उद्यम मंत्रालय भारत सरकार यांच्या सलग्न पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान यांच्यातर्फे करण्यात आले होते.या वर्षीचा पुरस्कार सामाजिक विकासाच्या क्षेत्रात पाच दशके सातत्याने कार्यरत असलेल्या दिलीपराव नाफडे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान समारंभात अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे होते. या वेळी देशभरातून ५०० हून अधिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातून उपस्थित असलेले भ्रातृमंडळाचे अध्यक्ष डी. टी. खाचणे, सचिव डी. के. देशमुख आणि प्रा. पद्माकर पाटील यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त करणाऱ्या इतर प्रमुख व्यक्तींमध्ये पंकज देशमुख, पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण, नीळकंठ चौधरी मुंबई, डॉ. मुरलीधर पाटील अकोला, उद्धव नारखेडे नागपूर, भास्कर भोसले आदर्श प्राचार्य, उरुळी कांचन, मंजिरी देशपांडे दिव्यांग सेवा, पुणे, डॉ. अभिषेक देवीकर निसर्गोपचार व योग, उरुळी कांचन, अॅड. महेश ढाके कायदेतज्ञ, अहमदनगर, डॉ. तेजस पाटील शैक्षणिक सेवा पुणे आदींचा समावेश आहे. दिलीपराव नाफडे यांनी आपल्या युवाअवस्थेपासून समाजातील विविध प्रश्नांची जाणीव ठेवत, ग्रामीण व शेतकरी समाजासाठी विशेष कार्य केले आहे. त्यांनी गावोगावी दुग्ध उत्पादक संस्था स्थापन करून शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवले. जलसंधारणाच्या उपाययोजना, ग्रामीण रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम, शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे कार्य प्रभावी ठरले आहे. महाराष्ट्र राज्य लेवा पाटीदार महासंघ तसेच भ्रातृमंडळाच्या माध्यमातून समाजबांधवांसाठी शिक्षण, आरोग्य, उद्योजकता आणि सामाजिक समरसतेच्या क्षेत्रात त्यांनी उभारलेल्या उपक्रमांचेही विशेष कौतुक झाले आहे. या अगोदरही नाफडे यांना विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

0 9 5 5 0 3
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *