वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव : गटशिक्षणाधिकारी गावडे

Khozmaster
2 Min Read

दुसरबीड:-विशेष प्रतिनिधी 

सध्या मोबाईल आणि इंटरनेटच्या अति वापरामुळे विद्यार्थी कृतीशून्य होत आहेत. परंतु, जर विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावली तर त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन सिंदखेडराजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी केले.सिंदखेडराजा येथे पंचायत समितीच्या गट साधन केंद्रात आयोजित बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंदखेडराजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे हे होते. तर प्रमुख उपस्थितीत वाघजाई केंद्र प्रमुख पंढरीनाथ बुरकुल, सिंदखेडराजा केंद्र प्रमुख अरुण खेडेकर, छत्रपती शाहू विद्यालय चिंचोली जहांगीरचे प्राचार्य राजेंद्र काळे आदी उपस्थित होते. मागील सत्रात पार पडलेल्या महावाचन उत्सव-२०२४ उपक्रमांतर्गत जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील विजयी ठरलेल्या तालुक्यातील ६ शाळेच्या एकूण १० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तकांचा संच मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शेलगाव राऊत येथील शिक्षक विठ्ठल जाधव व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुलजगावचे मुख्याध्यापक डी.बी. खरात यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच विजयी स्पर्धकांमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजली येथील श्रेया राजू सोळुंकी, स्नेहा सुधाकर भागडे, छत्रपती शाहू विद्यालय चिंचोली जहागीर व गौरव कैलास नागरे आदर्श विद्यालय सिंदखेडराजा यांनी सुद्धा त्यांचा अनुभव, वाचनाची आवड व वाचनाचा प्रवास आपल्या अल्प शब्दात व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलींचे शिक्षण तालुका समन्वयक पद्माकर गवई यांनी केले. तर आभार आयसिटीचे संगणक प्रशिक्षक जी. एस. केकान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र शिंगणे, शिक्षिका झळके, अमोल लोखंडे, विषयतज्ञ प्रवीण गवई आदींनी परिश्रम घेतले.

0 9 5 5 0 3
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *