बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
सरस्वती क्रीडा मंडळाच्या मैदानावर झालेल्या अंतिम रोमहर्षक सामन्यात गुरुकुल ज्ञानपीठने पोद्दार विद्यालयावर विजय प्राप्त करून विजेतेपद प्राप्त केले. पोद्दार विद्यालयाने द्वितीय क्रमांक, भारत विद्यालयाने तृतीय क्रमांक तर एडेड विद्यालयाने चतुर्थ क्रमांक प्राप्त करून यश मिळविले.सदर स्पर्धेचा मूळ उद्देश बुलढाणा मधील सर्व शाळेमधील – शिक्षकांना एकत्र आणणे गेट टुगेदर करणे हा आहे. शिक्षकांना खेळताना पाहून विद्यार्थ्यांना सुद्धा खेळण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आयोजक संजय देवल यांनी व्यक्त केली आहे. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद देत बुलढाणा मधील १२ शाळांनी आपल्या शाळेतील शिक्षकांचा हॉलीबॉल संघ या स्पर्धेमध्ये उतरविला होता. यावर्षी स्पर्धा सरस्वती क्रीडा मंडळ, बुलडाणाचे मैदानावर सायंकाळी फ्लड लाईटमध्ये खेळविल्या गेल्या. कुठलीही प्रवेश फी नसलेल्या या स्पर्धेचे आयोजक म्हणून भारती क्रीडा मंडळ, सरस्वती क्रीडा मंडळ, अष्टविनायक बहुउद्देशीय विकास मंडळ, भारत विद्यालय, बुलडाणा व ओम सोलर यांनी परिश्रम घेतले. २७ते २९ एप्रिल दरम्यान रंगलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन प्रााचार्य धनंजय किंबहुने, प्राचार्य उल्का अंतरकर, प्राचार्य अजय इंगळे,मुख्याध्यापक गजानन इंगळे, सरस्वती क्रीडा मंडळचे अध्यक्ष प्रवीण महाजन, मोहन घोंगटे, नवल गवई, गजानन चीम, गिरीश चौधरी यांचे हस्ते करण्यात आले. तर बक्षीस वितरण समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी महानकर, उपशिक्षणाधिकारी आशिष वाघ, डॉ. प्रवीण पिंपरकर, श्रीकृष्ण शेटे, नितीन जाधव, विनोद गायकवाड, प्रवीण महाजन, धनंजय किंबहुने, अजय इंगळे, ढवळे, मंगेश बोरसे यांचे हस्ते करण्यात आले. दोन्ही कार्यक्रमाचे संचलन प्रेषित सिद्धभट्टी यांनी केले. स्पर्धेचे यशस्वीतेसाठी संजय देवल, शशिकांत पवार, अरुण सौभागे, श्रीराम भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा पंच म्हणून मनोज श्रीवास, संदीप पैठणे तर स्कोअरर म्हणून आर्यन ठेंग यांनी काम पाहिले.
Users Today : 5