देऊळगाव राजा:- तालुका प्रतिनिधी
अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने अन्न वाया जाऊ नये, याची आपण काळजी घेतो. मात्र, लग्न समारंभाच्या माध्यमातून अन्नाची किती नासाडी होते याचा प्रत्यय सद्या येत आहे. लग्न लागत बसताना वधू-वरावर आशीर्वाद म्हणून टाकल्या जाणाऱ्या अक्षता, या ज्वारी व तांदूळ मिसळून तयार केल्या जातात. लोक अक्षतांच्या मुक्तहस्ते उधळण करत असले, तरी एका लग्नात तीस ते चाळीस किलो ज्वारी तांदूळ वाया जात असल्याचे दिसून येते. प्रत्येक लग्नात धान्याच्या अक्षदांची बेरीज केल्यास दररोज हजारो क्विटल धान्याची नासाडी होते. हे नुकसान टाळण्यासाठी फुलांच्या अक्षताचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या सर्वत्र लग्न कार्याची धूम सुरु आहे. एकेका दिवशी दाट लग्न तिथी असतात. सुमारे १०० ते १५० लग्न सोहळे पार पडतात. विवाहाच्या माध्यमातून वर-वधू गृह प्रवेश करतात. नवदांपत्याला आशीर्वाद देण्यासाठी लोकही आवर्जून उपस्थित असतात व वधू कडील मंडळी सर्वांना अक्षता मिळतील, यासाठी ज्वारी, तांदूळ व हळद मिसळून अक्षदा तयार करतात. लग्न सोहळा पार पडताना वधू-वरांच्या दिशेने अक्षता फेकल्या जातात. परंतु, त्या अक्षता तोरवरून त्यांच्या डोक्यावर न पडता जमिनीवरच पडतात. त्यानंतर त्या अक्षता लोकच पायदळी तुडवतात. ज्या भांड्यापासून खायला अन्न तयार होते, तेच धान्य आपणच पायाखाली सोडवतो, याचे भान लोकांना राहत नाही. तांदुळही भाताच्या माध्यमातून खाल्ल्या जातात. तसेच लग्न समारंभातच अन्नदान करतेवेळी ‘अन्न हे पूर्णब्रह्म’, म्हणत आपण ते वाया जाऊ नये, याची काळजी घेतो. याचबरोबर पंगतीमध्ये अन्नाचा तुकडा पडला, तर तो पायाखाली येऊ नये, म्हणून आपणच बाजूला उचलून ठेवतो. मग अशाच अन्नाचा म्हणजे अक्षतांना आपण पायदळी तुडवतो, हे कितपत योग्य ठरते?, असा प्रश्न स्वतःलाच विचारला गेला पाहिजे.
Users Today : 5