आता राज्यातील सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश कामगार मंत्री ना. फुंडकर यांच्या हस्ते नव्या गणवेशाचे अनावरण

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव:- तालुका प्रतिनिधी 

राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांसाठी आता एकसंध आणि शिस्तबद्ध गणवेश प्रणाली सुरू करण्यात येत आहे. १ मे २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात खाकी रंगाचा गणवेश अधिकृतरित्या लागू केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री ना. अॅड. आकाश फुंडकर यांनी दिली आहे.नव्या गणवेशात खाकी शर्ट आणि पॅटसह निळ्या रंगाची टोपी असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो आणि नाव असेल. महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत सुरक्ष कर्मचाऱ्यांसाठी नव्याने निश्चित करण्यात आलेल्या खाकी रंगाच्या गणवेशाचे अनावरण कामगार मंत्री ना. अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते आज नरिमन भवन, मुंबई येथे करण्यात आले. सुरक्षा रक्षकांच्या संघटनांनी आणि कर्मचाऱ्यांनी शासनाकडे गणवेशाबाबत एकसंधतेची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील १६ जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांमार्फत याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांची ओळख ठळकपणे दिसून येईल, शिस्तबद्धतेत वाढ होईल आणि सुरक्षाव्यवस्था अधिक सुसंगत व व्यावसायिक स्वरूप धारण करेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *