ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान बुलढाणा येथे महाराष्ट्र दिन सोहळ्यात सन्मानाने गौरविले

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात येणारे प्रतिष्ठित पोलीस महासंचालक पदक आज १ मे रोजी चिखली पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व खमक्या ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त बुलढाणा जिल्हा मुख्यालयात आयोजित भव्य सोहळ्यात पालकमंत्री ना. मकरंद पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.संग्रामसिंह पाटील यांनी पोलीस दलात १५ वर्षांहून अधिक काळ विविध पदांवर काम करत उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवली आहे. पुणे ग्रामीण, मुंबई, अकोला आणि बुलढाणा यांसारख्या विविध विभागांत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार म्हणून संग्रामसिंह पाटील यांनी स्थानिक समुदायाशी प्रभावी समन्वया साधत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वासार्हता निर्माणा झाली आहे. याशिवाय, गुन्हेगारी नियंत्रण, सामुदायिक संवाद आणि कायद्याचे अचूक पालना यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *