बुलढाणा ;- जिल्हा प्रतिनिधी
जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पळसखेड भट येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी ध्वजारोहण कृउबास संचालक मजानन उबरहंडे यांचे हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून अफसर चाचा, देविदास सिरसाट, भगवान गायकवाड, सुनील जुंबड, रमेश सुरडकर, शे. बब्बू, उषाताई फोलाने, कविता खंडागळे, जीवन सिरसाट, दीपक म्हस्के, वसुदेव बिलारी, अनंता गीरी, विष्णू पाटोळे, समाधान कोलते, गजानन विचोले, मनोहर सिरसाट यांसह बहुसंख्य पालकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले. यावेळी आयोजित आनंद मेळाव्यात विजयी स्टॉलला ट्रॉफी वितरण करण्यात आले. यात प्रथम क्रमांक इयत्ता ११ वीच्या विद्यार्थिनींनी पटकावला तर द्वित्तीय क्रमांक इयत्ता ९ वीच्या विद्यार्थिनींनी मिळवला, तर तृतीय क्रमांक हिमांशु किशोर तायडे याने मिळवला. शेवटी विद्यार्थ्यांच्या सत्राचा निकाल घोषीत करण्यात आला, निकाल घेण्यासाठी बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष संदीप शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन राजेंद्र गायकवाड यांनी केले जिल्ह्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन १ मे २०२५ रोजी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Users Today : 6