शेदुर्जन मराठी पूर्व माध्यमिक शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Khozmaster
1 Min Read

शेदुर्जन (तालुका प्रतिनिधी):
शेदुर्जन येथील स्थानिक मराठी पूर्व माध्यमिक शाळेमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात व राष्ट्रभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्धवराव शिंगणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शोभाताई शिंगणे, उपसरपंच नकुल शिंगणे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश आढाव, ग्राम महसूल अधिकारी सुशीलकुमार शीलवंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादनाने झाली. ध्वजारोहण अरविंद शिंगणे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पुरुषोत्तम शिंगणे यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक एस. बी. पत्रे यांनी पार पाडले.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे ऐतिहासिक महत्त्व आणि सामाजिक प्रगतीवरील विचार मांडले. शाळेतील शिक्षक पी. एम. शिंगणे, एन. डी. मेरत, एस. व्ही. कोलते, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक पठाण यांच्यासह अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग व पशुवैद्यकीय कर्मचारी, तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन शिक्षक एस. व्ही. कोलते यांनी केले.

0 9 5 5 0 4
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *