वरवट बकाल येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

KHOZ MASTER
1 Min Read

संग्रामपूर;-तालुका प्रतिनिधी 

संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर प्राचार्य डॉ. येरणकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले आणि सर्वांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायन केले. कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. गजानन पैकट यांनी केले.

कार्यक्रमाला सातपुडा कॉन्व्हेंटचे प्राचार्य बिख्यात नायक, महाविद्यालयाचे अधिक्षक अजय चोपडे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सातपुडा कॉन्व्हेंटचे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यात एकता, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *