बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा  (जिल्हा प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात आणि शासकीय शिस्तबद्धतेने पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

समारंभास अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, अंजिक्य गोडगे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व खेळाडूंना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि खेळाडूंचा मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाने सामाजिक एकता, कार्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाचे महत्त्व अधोरेखित केले.

0 9 5 5 0 4
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *