बुलढाणा ;- जिल्हा प्रतिनिधी
आशा व गटप्रवर्तकांचा विविध कामांचा मोबदला गेल्या ६ महिन्यांपासून थकीत आहे. थकित असलेला मोबदला मिळावा म्हणून संघटनेच्या वतीने आरोग्य संचालक व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे वेळोवेळी पत्र व्यवहार केल्यानंतर कळाले की, केंद्र सरकारकडून शासनस्तरावरून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे मानधन थकीत आहे. सदर मानधन न मिळाल्यास २० मे २०२५
पासून कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आशा व गटप्रवर्तकांनी दिला आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मे २०२५ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील बुलढाण्यात आले असता कामगार दिनानिमित्ताने जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांवर आणि गेल्या ४/५ महिन्यांपासून थकीत असलेल्या केंद्र सरकारच्या मानधना बाबत मागण्यांचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी
उपाध्यक्ष विजया ठाकरे, अर्चना मोरे आणि शारदा गवळी इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ह्यातील बहुतांश आशा वर्कर्स ह्या अत्यंत गरिब व एकल कुटुंबातील आहेत. त्यांच्याकडे या मोबदल्या शिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही. आशा व गटप्रवर्तकांचे थकीत मानधन तातडीने देण्यात यावे, यासाठी आपल्या पातळीवरून राज्यस्तरावर प्रयत्न करण्यात यावे अन्यथा २० मे रोजी कामगार
संघटनेच्या कृतीसमितीने भारतभर जो संप पुकारलेला आहे, या देशव्यापी संपात रस्त्यावर उतरून जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक मोठ्या प्रमाणात सहभागी होतील, असा इशाराही या निवेदनात संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
थकीत मानधनासाठी घेतली पालकमंत्र्यांची भेट आशा व गटप्रवर्तकांचा इशारा : मानधन न मिळाल्यास २० मेपासून कामावर बहिष्कार
0
9
5
5
0
5
Users Today : 7
Leave a comment