बुलढाणा:- जिल्हा प्रतिनिधी
निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने विसरलेल्या महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी शुक्रवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक होत ट्रॅक्टर मोर्चा काढला. शेकडो ट्रॅक्टर सहभागी झाल्याने बुलढाण्यातील वाहतूक जाम झाली. भर उन्हात निघालेल्या मोर्चामुळे यंत्रणेचादेखील चांगलाच घाम निघाला. अर्थात शासन, प्रशासनाचीही कोंडी यामुळे झाली. हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत या मोर्चात सहभाग घेतला. आंदोलनाचा हा वनवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभरात पेटेल आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला. शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्यात जिजामाता प्रेक्षागार परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. संगम चौक, जयस्तंभ चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घडकला. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. तत्पूर्वी जिजामाता प्रेक्षागारावर झालेल्या सभेत दत्ता पाटील, संदीप शेळके, डी. एस. लहाने यांच्यासह नेत्यांच्या आक्रमक भाषणांनी जोश भरला, मोर्चात सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील, महिला आघाडी जिल्हा संघटिका विजया खडसन, जिल्हा संघटक प्रा. डी. एस. लहाने, गोपाल बछिरे, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, युक्रोना जिल्हा प्रमुख नंदु कऱ्हाडे, शुभम पाटील, संजीवनी वाघ, प्रा. आशिष रहाटे, सुनील घाटे, बद्री बोडखे, तुकाराम काळपांडे, लखन गाडेकर, विजय इंगळे, लिंबाजी पांडव, किरान धोंडगे, गजानन वाघ, श्रीराम खेलवार, दीपक चांभारे, ईश्वर पांडव, प्रा. सिद्धेश्वर आंधळे, मोहित राजपुत, मोहंमद सोफियान, गणेश सोनुने, अशोक गव्हाणे, सुधाकर आघाव, किशोर गारोळे, गोबिंद झोरे, श्रीराम झोरे, डॉ. अरुण पोफळे, संजय वडतकर, गजानन उबरहंडे, विजय इतवारे, सुनील गवते, संजय गवळी, बबन खरे, संजय शिदे, राजू मुळे तसेच शिवसेना, गुवसेना महिला आघाडी, किसान सेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सामील झाले होते. सुत्रसंचालन युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे व तालुकाप्रमुख लखन गाडेकर यांनी केले.महायुतीचे सरकार फसवे : आ. खरात आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की, आता शेतकरी जागा झाला आहे. शिवसेना हा एकमेव पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. महायुतीतील एकतरी आमदार, नेत्याने शेतकयांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. का? असा सवाल त्यांनी केला, खोटी आश्वासने देऊन महावुतीने सत्ता मिळविली, आता ते सत्तेचे लोणी खाण्यात व्यस्त असून महायुतीचे हे सरकार फसवे आहे, असेही खरात म्हणाले, नाफेडची खरेदी केंद्रे बंद आहेत. अजूनही सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. आता झोपेच सोंग घेणाऱ्या सरकारविरोधात शिवसेनेचे भगवे वादळ पेटून उठले आहे.विश्वासघाती सरकारला आंदोलनाचा वनवा भस्मसात करेल : जयश्रीताई शेळके शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणत महायुतीचे सरकार सतेत आले. मात्र तीन महिन्यांच्या आता त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना दिलेला शब्द पाळला. मंत्रिमंडव्याच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. मात्र आताचे हे महायुतीचे सरकार अतिशय विश्वासघातकी आहे, असा हल्लाबोल शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केला. कर्जबुडव्या मोठ्या कंपन्या आणि उद्योगपर्तीचे कर्ज सरकारने राईट ऑफ केले म्हणजे एकप्रकारे माफच केले, मात्र उन्हातानात परिश्रम करणाऱ्या मावबाप शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, विदर्भमराठवाड्यात गतकाळात अडीच हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे या सरकारला लाज वाटली पाहिजे. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आंदोलनाचा वणवा पेटवला आहे. या वणव्यात हे महायुती सरकार भस्मसात होईल, असे शेळके म्हणाल्या. हक्काची कर्जमाफी मिळवून घेणारच : जालिंदर बुधवत शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. बेरोजगारी वाढली आहे. गावागावांत प्यायला पाणी नाही. सरकारने जुमला करून, वेगवेगळी आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या. मात्र आश्वासनांची पूर्तता होत नाही. कर्जमाफीचे आश्वासन दिले. आता सरकारने शब्द फिरवला आहे, शालेय विद्यार्थ्यांना वर्ष झाले तरी गणवेश मिळाला नाही, लोकांची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा आहे. निर्दयी व खोटारड्या सरकारला भानावर आणण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कर्जमाफी मिळवून घेतल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशाराह बुधवत यांनी दिला.
Users Today : 7