प्रेयसीचा खून करून प्रियकराने घेतला गळफास मराठवाड्यातील साजापूर येथील घटना : मुलगी खामगाव तालुक्यातील आवारची रहिवासी

KHOZ MASTER
2 Min Read

वाळूज महानगर:-विशेष प्रतिनिधी 

प्रेयसीचा खून करून प्रियकारानेही तिच्याच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधील साजापूर येथे उघडकीस आली. दोघांचेही मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. शिवानंद रमेश जाधव (२६, रा. अजिंठा ता. सिल्लोड ह.मु. साजापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, तर वैष्णवी महादेव खराटे (२४, रा. आवार, ता. खामगाव, जि. बुलढाणा) असे खून केलेल्या प्रेयसीचे नाव आहे.
प्रियकर शिवानंद याचे तीन दिवसांपूर्वीच दुसरे लग्न झाल्याच्या कारणावरून दोघांत वाद झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
वैष्णवी खराटे ही साजापूर येथील एसबीआय बँकेच्या पाठीमागे झरीना मुसा शेख यांच्या घरात राहात होती. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत ती काम करत होती. दरम्यान, चार ते पाच महिन्यांपूर्वी शिवानंद जाधव हा तेथे तिच्यासोबत राहण्यासाठी आला होता. शुक्रवार, २ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने घरमालकाची मुलगी त्यांना सांगण्यासाठी गेली होती. बराचवेळ दरवाजा वाजवत होती. मात्र आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर घर मालकांनीही आवाज दिले. आवाज ऐकून शेजारील नागरिकही तेथे जमा झाल्याने काही दक्ष नागरिकांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सपोनि संजय गित्ते, पोउपनि प्रवीण पाथरकर, पोहेकॉ राम तांदळे, बाळासाहेब आंधळे, योगेश गोमलाडू, महेंद्र साळुंके, मंगेश मनोरेंसह टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, एक तरुण साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तर एक तरुणी जमिनीवर निपचित पडलेली होती. पोलिसांनी त्या दोघांना रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्या दोघांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार मंगेश मनोरे करीत आहेत.तीन दिवसांपूर्वीच झाले होते शिवानंदचे दुसरे लग्न वैष्णवी व शिवानंद या दोघांचे प्रेमसंबंध असल्याने त्यांनी लग्न केले. त्यानंतर चार ते पाच महिन्यांपूर्वी शिवानंद हा तिच्यासोबत राहण्यासाठी आल्याने तिने राहात असलेली रूम बदली करून, खाली दोन रूम घेऊन दोघे राहत होते. मात्र शिवानंदचे तीन दिवसांपूर्वीच दुसरे लग्न झाले होते. दोघांमध्ये वाद झाल्याने तिचा खून करून त्याने स्वतःहा गळफास घेतल्याचे सांगत, शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *